पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर तालुका पोलिसांनी आज दि. 8 जुलै रोजी दुपारी साडे तीन वाजण्याचे सुमारास 300 किलो वजनाचा गांजा पकडला आहे.
याबाबत पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याकडून समजलेले वृत्त असे की, मोहोळ-पंढरपूर मार्गावरील भीमा स्टॅन्ड येथे मोहोळकडून पंढरपूरकडे येणार्या येणार्या क्रुझर (एम.एच. 13 एसी-9656) ही गांजा वाहतुक करणारी गाडी व 300 किलो वजनाच्या गांजासह 17 लाख 28 हजाराचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे. यातील आरोपी माणिक साहेबराव चौगुले (वय-42), रा. नारायण चिंचोली, ता.पंढरपूर यालाही गजाआड केले आहे.
तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक के. के. खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलिस पथकातील पीएसआय गोंदे, पो.हे.कॉ. नितीन देवकते, साळुंखे, पाटील, पो.ना.सरडे यांनी ही कामगिरी केली. या घटनेची ङ्गिर्याद पो.कॉन्स्टेबल एन.एम. देवकते यांनी तालुका पोलिस ठाण्यात दिली असून अधिक तपास पीएसआय गोंदे हे करीत आहेत.
आषाढी यात्रा काळात पंढरपूर तालुका पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे तालुक्यातील क्राईमला आळा घालण्याचा चांगला प्रयत्न पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे व तालुका पोलिसांकडून होत असल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Posted inPandharpur Live News

