हा आवाज ज्यांना ऐकु गेला त्या प्रत्येकालाच हा आवाज जवळच कुठे तरी झाल्याचा भास झाला होता. पंढरपूर तावशी या परिसरातही गूढ आवाज आला. हा आवाज इतका मोठा होता की अनेकांच्या घरातील भांडे खाली पडली तर पंढरपूरमधील कांही दुकान गाळ्यांना तडे गेल्या बाबत ची चर्चाही सोशल मिडीयावर पसरलेली होती.
सुस्ते,तारापूर, मगरवाडी, तुगंत, अजनसोंड, बिटरगाव, खरसोळी , पोहरगाव, वीटे, नारायण चिंचोली, ईश्वर वठार, महूद व परिसरात असा आवाज येण्याच्या घटना यापूर्वी घडल्या असल्याची चर्चाही सुरु होती.
याबाबत शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर नावंदे यांच्याशीही माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता याबाबत ते सुध्दा याबाबत अनभिज्ञ होते. नेमका हा आवाज कोठून आला याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. जेट सारखी विमाने आसमंतातून जात असताना असा आवाज निर्माण होऊ शकतो. किंवा जमिनीत घडलेल्या भुगर्भाच्या हालचालीमुळे ही असा आवाज निर्माण होऊ शकतो.
हा आवाज कशामुळे आला हे समजेलच. परंतु या आवाजाने कोणतीही हानी झालेली नाही. या आवाजामुळे कोणीही घाबरण्याचे कारण नाही. पंढरपूर लाइव्ह च्या माध्यमातून आम्ही सर्वांना सांगु इच्छितो की, या आवाजाने कोणतीही जिवीत अथवा वित्त हानी झालेली माहिती अथवा भुकंपाचा सौम्य धक्का वैगैरे अधिकृतरित्या मिळालेली नाही. कोणीही याबाबत अफवा पसरवु नये.

