![]()
। पंढरपूर, प्रतिनिधी
भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत पोहचविणारे श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
येथील श्रीसंत नामदेव महाराज मंदिरात आषाढ वद्य 1 बुधवार दि. 20 जुलै ते श्रावण शु. 12, सोमवार दि. 18 ऑगस्ट या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. यामध्ये दररोज सकाळी 9 ते 12 वा. श्रीसंत नामदेव महाराज गाथा भजन, दुपारी 4 ते 5 तिर्थावळी प्रवचन व हरिपाठ, रात्री 7 ते 9 वा. किर्तनसेवा सुरु आहे. मुख्य कार्यक्रमाच्या अंतर्गत शनिवार दि. 30 जून रोजी सकाळी 10 वाजता एकादशी दिवशी दिंडीची नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. रविवार दि. 31 जुलै रोजी जागराचे कीर्तन व रात्री क्षीरापत महोत्सव साजरा करण्यात आला.
सोमवार दि. 1 ऑगस्ट रोजी श्रीसंत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्यावर आधारित ह.भ.प. केशव महाराज नामदास यांचे कीर्तन झाले. पुष्पवृष्टी झाल्यानंतर श्री केशवराज व संत नामदेव महाराजांची आरती करण्यात आली. यावेळी माजी आ. सुधाकरपंत परिचारक, ह.भ.प. नामदास महाराज परिवार, शिंपी समाज विश्वस्त मंडळ, वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी उपस्थित होते. संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त समस्त नामदेव शिंपी समाजाच्यावतीने वारकरी, भाविक व समाज बांधवांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. प्रारंभी पहाटे श्री केशवराज व संत नामदेव महाराजांची पूजा अध्यक्ष गणेश उंडाळे, उदय मुळे, समर्थ सातारकर यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. केशवराज संस्थेच्यावतीने विश्वस्त राजेश धोकटे, शशिकांत जवंजाळ यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली. तसेच श्री विठ्ठल मंदिर व संत नामदेव पायरी येथे महेश गानबोटे, दत्तात्रय चांडोले यांच्या हस्ते महानैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर समस्त वारकरी, भाविक व समाज बांधवांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यासाठी उपाध्यक्ष संजय जवंजाळ, विलास पोरे, बाबासाहेब म्हैंदरकर, अनिल निकते, संजय चांडोले, दत्तप्रसाद निपाणकर, देविदास बोधे, माधव मुळे, पांडुरंग गाणबोटे, जयवंत कांबळे, अनंता पतंगे (म्हेत्रे), युवक मंडळाचे अध्यक्ष सागर गानमोटे, उपाध्यक्ष महेश सरवदे, शैलेश धट, गणेश काकडे, अक्षय म्हैंदरकर, अक्षय बंगाळे, प्रशांत मुळे, कृष्णा जवंजाळ, धिरज काकडे, कौस्तुभ रेळेकर, किशोर काकडे यांच्यासह महिला मंडळाच्या सर्व महिला सदस्यांनी परिश्रम घेतले.
मंगळवार दि. 2 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 12 वा. ह.भ.प. केशव महाराज नामदास यांचे काल्याचे कीर्तन झाले. तसेच सायंकाळी 7 वाजता संत नामदेवरायांच्या पालखीची दिंडी लवाजम्यासह नगर प्रदक्षिणा झाली. संत नामदेव मंदिरातून निघालेला हा पालखी सोहळा विप्रदत्त घाट, कालिकादेवी चौक, काळा मारुती, चौफाळा, नाथ चौक, तांबडा मारुती, चंद्रभागा वाळवंटा, पुंडलिक मंदिर, महाद्वार घाट, संत नामदेव पायरी या मार्गे पुन्हा मंदिरात आला. ज्ञानोबा-तुकाराम, नामदेव-जनाबाईचा गजर करत, टाळ-मृदूंगाच्या निनादात ठिकठिकाणी मानाचे अभंग म्हणण्यात आले. नामदेव पायरी येथे अनेक अभंग झाल्यानंतर आरती करण्यात आली. पालखी सोहळा मंदिरात आल्यानंतर नामदास परिवारातील महिलांनी पालखीचे औक्षण केले. याठिकाणी अभंग व आरती झाल्यानंतर ह.भ.प. नामदास महाराजांच्या हस्ते मानकर्यांना श्रीफळ प्रसाद देण्यात आला. यावेळी वारकरी, भाविक उपस्थित होते.
संजीवन समाधी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वश्री ह.भ.प. केशव महाराज, कृष्णदास महाराज, माधव महाराज, मुकुंद महाराज, ज्ञानेश्वर महाराज नामदास यांच्या मार्गदर्शनाखाली केदार, निवृत्ती, मुरारी, विठ्ठल, सोपान, एकनाथ, हरि महाराज व नामदास परिवाराने परिश्रम घेतले.
फोटो
01 – संत नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्यावरील कीर्तनाप्रसंगी ह.भ.प. नामदास महाराज, माजी आ.सुधाकरपंत परिचारक, शिंपी समाजाचे विश्वस्त व भाविक.
02 – श्री विठ्ठल व संत नामदेव पायरी येथे महानैवेद्य नेताना महेश गानबोटे, दत्तात्रय चांडोले व शिंपी समाज बांधव
03 – श्री केशवराजाची सपत्नीक पूजा करताना राजेश धोकटे व नामदास महाराज
04 – श्रीसंत नामदेव महाराजांची सपत्नीक पूजा करताना शशिकांत जवंजाळ व नामदास महाराज
(सर्व फोटो – किशोर काकडे, पंढरपूर)
