
पंढरपूर (प्रतिनिधी):- माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, आमदार प्रशांतराव परिचारक व अध्यक्ष उमेशराव परिचारक यांच्या पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी च्या प्रभाग क्र. 13 अ मधील अधिकृत उमेदवार सौ. सरुबाई ढोले आणि 13 ब चे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब जगताप या दोन्ही उमेदवारांनी प्रचारात सरशी घेतली असून आपल्या प्रभागातील मतदारांशी थेट भेटून संवाद साधण्यावर त्यांनी भर दिला आहे. सरुबाई ढोले या माजी नगरसेविका आहेत. ढोले यांनी आपल्या कारकिर्दीत आपल्या प्रभागात अनेक विकासकामे करुन जनतेने टाकलेल्या विश्वासास पात्र राहुन दाखविले आहे. त्या आज पुन्हा निवडणुक रिंगणात आहेत. भाऊसाहेब जगताप हे पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक आणि एक सेवाभावी वृत्तीचे जनसामान्यात सहज मिसळणारे समाजसेवक म्हणून सर्वपरिचित आहेत. मागील पंचवार्षिक निवडणुकीत भाऊसाहेब जगताप यांचा निसटता पराभव झाला होता. परंतु त्यांनी अपला जनसंपर्क कधी तुटू दिला नाही. निवडणुकीच्या रणांगणात थोडक्या मतांच्या फरकाने पराभुत झालेल्या भाऊसाहेबांनी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या मनावर मात्र विजय मिळविलेला आहे. आज पुन्हा ते नव्या उमेदीने प्रामाणिकपणे केलेल्या जनसेवेची व समाजकार्याची शिदोरी सोबत घेऊन मतदारांच्या समोर जात आहेत.
प्रभाग क्रमांक 13 मधील सर्व भागातील नागरिकांच्या घराघरात पोहचण्याचे महत्वपुर्ण काम या दोन्ही उमेदवारांनी केलेले आहे. युवानेते प्रणव परिचारक, माजी नगराध्यक्ष अरुण कंडरे, समाजसेवक सुनील ढोले यांच्यासह या उमेदवारांनी घराघरात जाऊन मतदार बंधु-भगिणींना आपले चिन्ह कपबशीला मत देऊन आपल्या सेवेची संधी देण्याची विनंती केली आहे. त्याचप्रमाणे कॉर्नर सभाही घेतल्या आहेत. बोलण्यापेक्षा कृतीवर भर देणारे भाऊसाहेब जगताप व सौ. सरुबाई ढोले या दोन्ही उमेदवारांच्या नावाची चर्चा सध्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये होत असून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
यावेळी पंढरपूर लाईव्ह शी बोलताना भाऊसाहेब जगताप म्हणाले की, निवडणुक लढविणे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर न ठेवता या प्रभागातील विकासकामांना चालना देऊन जनसेवा करणे हा आमचा एकमेव उद्देश आहे. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या आशिर्वादाने व आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आघाडीचे अध्यक्ष उमेशराव परिचारक यांच्या सहकार्यातून या प्रभागाचा कायापालट करण्यासाठीच आमची उमेदवारी आहे. जनता आमच्या पाठीशी आहे. आमची पाटी कोरी आहे. कोणत्याही प्रकारचा डाग आमच्या चारित्र्यावर नाही. कोणत्याही प्रकाराने आम्हाला आमची मान खाली घालावी लागेल असे कृत्य आमच्याकडून झाले नाही आणि होणारही नाही. प्रामाणिकपणे कार्य करण्याची शिकवण आम्हास मिळालेली आहे. जनतेच्या मतांचा आदर ठेवून मी कोणतीही खंत न बाळगता पुन्हा नव्या दमाने जनतेसमोर जात आहे. येथील लिंक रोडवरच गेल्या कित्येक वर्षापासून माझा व्यवस ाय आहे. अनेक सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग घेतलेला आहे. नगरसेवक पदावर नसलो तरी स्वईच्छेने जनतेची कामे केलेली आहेत. आज आम्हाला प्रचारादरम्यान जनतेतून मिळणारा चांगला प्रतीसाद पाहुन आमच्या या कार्याची दखल नागरिकांनी घेतलेली असल्याचे दिसून येत आहे.
मागील काळात आमच्या मातोश्री सरुबाई ढोले यांनी नगरसेवक पदावर असताना केलेल्या कार्याची पोहोच नागरिक मतदार बंधु-भगिणी भरघोष मतांच्या रुपाने देणार असून आमचा विजय निश्चित असल्याचे मत सुनील ढोले यांनी व्यक्त केले.



