बघा स्पेशल व्हिडिओ रिपोर्ट.. मेजर कुणाल गोसावी यांचा साश्रु नयनांनी घेतला अखेरचा निरोप…चिट्ठी ना कोई संदेश.. जाने ओ कोनसा देश… जन्हां तुम चले गये…

अब तुम्हारे हवाले वतन साथियो….।
मेजर कुणाल गोसावी यांचा हजारो पंढरपूरकरांनी साश्रु नयनांनी घेतला अखेरचा निरोप
लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
        पंढरपूर (भगवान वानखेडे): – पाकिस्तान बद्दलची प्रचंड चीड अन संताप प्रत्येकाच्या मनात साठलेला होता… कुणालच्या रूपाने देशाच्या सीमेवर तळपणारा तेजस्वी तारा निखळलेला होता… प्रत्येकजण गोसावी कुटूंबियांवर ओढवलेल्या या आकस्मिक दुःखात सहभागी झाला होता… अबाल-वृध्दांपासून सर्व स्तरातील पंढरपूर शहर अन तालुक्यातील जनता या वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी वाखरीतील गोसावी मळ्यात हजारोंच्या संख्येने दाखल झाली होती. या सर्वांच्या उपस्थितीत शहिद मेजर कुणाल गोसावी यांच्यावर वाखरी येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद मेजर कुणाल यांची कन्या उमंगने आपल्या पित्याच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळी शहीद वीराच्या आईचा आक्रोश प्रत्येकाचे काळीज पिळवटून टाकणारा होता. आपल्या काळजाच्या तुकड्याला अखेरचा निरोप देताना या माऊलीने एकच टाहो फोडला अन् उपस्थित प्रत्येकाचा कंठ दाटून आला.पंढरीचे सुपूत्र मेजर कुणाल गोसावी यांना आज हजारो पंढरपूरकरांनी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *