कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांची प्रमुख उपस्थिती
पंढरपूर (प्रतिनिधी):- नारायण चिंचोली ता. पंढरपूर येथील पुरातन सुर्यनारायण मंदिरातील सुर्यनारायणाची महापुजा आमदार बबनदादा शिंदे यांनी सपत्नीक केली. यावेळी पांडुरंग परिवाराचे कुटूंबप्रमुख कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. शिंदे म्हणाले, नारायण चिंचोली येथील ग्रामस्थांनी एकजुटीने गावच्या विकासासाठी प्रयत्न केल्यानेच या गावाचा कायापालट झाला आहे.हे गाव आदर्शग्राम,तंटामुक्त ग्राम झाले आहे.आता गावात अनेक नाविन्यपुर्ण विकासकामे करण्यासाठी आम्ही कटीबध्द असून यासाठी ठोस प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आ.बबनदादा शिंदे यांनी दिले आहे.नारायाण चिंचोली येथे सुर्यनारायण देवाच्या महापुजेसाठी ते काल आले असता ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते.
नारायण चिंचोली येथे आ.बबनदादा शिंद्े यांच्या निधीतून तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध विकासकामे करण्यात आली आहेत.आता या गावात अनेक वैशिष्यपुर्ण कामे करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असुन आज येथील पुरातन सुर्यनारायण मंदीरात आ.शिंदे यांनी सपत्नीक महापुजा केली.यावेळी पांडुरंग परिवाराचे कुटुंब प्रमुख सुधाकरपंत परिचारक, पं.स.चे मा.सभापती अॅड.वामनराव माने,मा.जि.प.सदस्य दिलीप घाडगे,कृ.बा.समितीचे मा.उपसभापती लक्ष्मण धनवडे, विठ्ठल साखर कारखान्याचे माजी संचालक विलास भोसले,प्रा.सुभाष माने,चंद्रकांत पवार,महादेव घाडगे,पं.स.सदस्य औदुंबर मेटकरी,मा.सरपंच नितिन मस्के,विठ्ठल माने,शिवाजी गुंड,लक्ष्मण कोले,धर्मराज नलवडे,बळवंत धनवडे,अंगद रणदिवे,नागनाथ फराटे,सुदाम मोरे,संजय देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने आ.बबनदादा शिंदे यांना नारायण चिंचोली ते बाभळगाव अपुर्ण रस्ता पुर्ण करणे,बीरोबा देवस्थानला निधी देण्याबाबत,नारायण चिंचोली नविन ग्रा.प.कार्यालयासाठी तिर्थक्षेत्र आराखडा 2017 चा निधी,नारायण चिंचोली ते भारतीबुवा शिवरोड,ईश्वर वठार नारायण चिंचोली येथील ओढ्यास कॅनालचा दर्जा देण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी प्रा.दत्तात्रय मस्के,विष्णू माने,संजय देशमुख,दत्तात्रय कोले,शिवलींग हिंगमीरे,भाऊसाहेब माने,ज्ञानेश्वर मस्के,आप्पासाहेब वाघमोडे,विजय कोळेकर,बापुराव कोले,श्रीधर कोळेकर,अभिजीत कवडे आदी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांचा सत्कार ग्रामस्थ व ट्रस्टच्या वतीने लक्ष्मण धनवडे व विठ्ठल माने यांच्या हस्ते करण्यात आला.

