👁 9 Views

गुरुवार पेठेत जुगार अड्ड्यावर छापा , 17 जणांविरुद्ध कारवाई

 

जुगार अड्डयावर छापा टाकून सामाजिक सुरक्षा विभागाने 17 जणांविरुद्ध कारवाई करीत 30 हजारांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुरूवार पेठेत करण्यात आली.


गुरुवार पेठेत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकून 16 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 30 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. 


आरोपींविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, 


उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, एपीआय अश्विनी पाटील, बाबा कर्पे, मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, इरफान पठाण, इम्रान नदाफ, हणमंत कांबळे, संदीप कोळगे, अमित जमदाडे यांनी केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *