![]()
शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्ज माफीसाठी मित्रपक्षांचा वाढता रेटा … पंढरपूर तालुक्यात रास्ता रोको
पंढरपूर- आज सकाळी 10:00 वा , शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील भोसे पाटी येथे रास्ता रोको करण्यात आला. भोसे व परिसरातील शेतकरी बांधव तरूणांनी रास्ता रोकोला उपस्थिती दर्शवुन शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ झाले पाहिजे , शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे, ऊसाचे पहिल्या हप्त्याची उर्वरीत रक्कम व दुसरा हप्ता 400 रूपये तसेच शेतकऱ्यांना पेन्शन अशा विविध मागण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला…
एकीकडे संघर्ष यात्रेसाठी तालुक्याती नेते मंडळीची झालेली नचक्की व त्याच्या कडून झालेल्या शेतकऱ्यांच्या फसवणुकीची आगपाकड याठिकानी झाली तालुक्यातील काही करखान्यांनी गाळप हंगाम सुरवातीला 2300 रू. पहिल्या हप्त्याची घोषणा करूण 1750 व 1930 रू. प्रमाणेच शेतकऱ्यांची बोळवन केली त्यांनी त्वरीत उर्वरीत रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावा.
ज्या कारखान्यांनी 2300 रू.चा पहिला हप्ता दिला आहे त्यांनी साखरेचा वाढलेला दर पाहता शेतकऱ्यांना टनास 400 रू.प्रमाणे दुसरा हप्ता त्वरीत देण्यात यावा ही मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे नेते बी.पी.रोंगे सर,माजी संचालक खटके आप्पा ,पांडु तात्या स्वाभिमानीचे विष्णु भाऊ बागल,समाधान फाटे,सचिन पाटील, इ.पदाधिकारी , कार्यकर्ते शेतकरी तरूणांनी अपस्थिती होती, रास्ता रोकोमुळे रस्त्याच्या दुतर्फी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
