👁 4 Views

बाबो! 4 मुलांची आई 17 वर्षीय मुलाच्या प्रेमात झाली वेडी , म्हणाली ‘ माझ्याशी लग्न कर नाहीतर….

चार मुलांची आई एका 17 वर्षीय मुलाच्या प्रेमात पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेने मुलावर लग्न करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून शेवटी मुलाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली.


पोलिसांनी महिलेविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतीपुरम कॉलनीतील रहिवासी मोहम्मद उस्मान वारसी यांचा 17 वर्षीय मुलगा शाहेब वारसी हा शिंपी होता. शेजारच्या एका 30 वर्षीय महिलेशी वर्षभरापूर्वी त्याचे प्रेमसंबंध होते. महिलेचे सासर निगोही शहरात आहे. तिला चार मुलं आहेत. दोघांमध्ये जवळीक वाढली. नातेवाईकांनी आक्षेप घेतल्यानंतर महिलेने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.


उस्मान वारसी यांनी सांगितले की, महिलेने धमकी दिली होती की, जर लग्न केले नाही तर ती मुलाला खोट्या प्रकरणात अडकवेल. 22 फेब्रुवारी रोजी नातेवाईकांना न सांगता मुलगा शेतात गेला आणि त्याने विषारी द्रव्य प्राशन केले.


हा प्रकार नातेवाईकांना कळताच त्यांनी मुलाला रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर उस्मान यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे अधिकारी अमित पांडे यांनी सांगितले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *