![]()
चैत्री वारीनिमित्त पंढरीत जमला अडीच लाख वारकर्यांचा मेळा..!
पंढरपूर लाईव्ह वृत्त:-
विठ्ठल-रुक्मिणी मंदीरे समितीच्या वतीने चैत्री वारी एकादशी निमित्त उपविभागीय अधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांच्या हस्ते सपत्निक श्री विठ्ठलाची आणि मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांच्या हस्ते रुक्मिणी मातेची नित्यपुजा संपन्न झाली.
यावेळी शहर पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे,मंदिर समितीचे लेखाधिकारी श्री. वाळुंजकर, श्री. ताटे यांच्यासह मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
आज दि. 7 एप्रिल रोजी चैत्र शुध्द एकादशी रोजी पंढरीची चैत्री वारी… पंढरपूर शहराचा परिसर व चंद्रभागेचे तीर भगव्या पताका घेतलेल्या वारकर्यांच्या गर्दीने फुललेले आढळून येत होते.
सरासरी अडीच लाख वारकरी भक्तांचा मेळा आज पंढरीत दाखल झाला होता.

