धक्कादायक:- नागपूरच्या आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर बलात्कार पीडित मुलगी १७ वर्षांची असून एका ज्वेलर्सच्या दुकानात काम करत होती. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून आमदार निवासांच्या एकूणच गलथान कारभाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

धक्कादायक:- नागपूरच्या आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पीडित मुलगी १७ वर्षांची असून एका ज्वेलर्सच्या दुकानात काम करत होती.

या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून आमदार निवासांच्या एकूणच गलथान कारभाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Nagpur News
नागपूरच्या आमदार निवासात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून आमदार निवासांच्या एकूणच गलथान कारभाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

पीडित मुलगी १७ वर्षांची असून एyका ज्वेलर्सच्या दुकानात काम करत होती. त्याच दुकानाच्या मालकाने बाहेरगावी फिरायला जाण्याच्या बहाण्याने आमदार निवासात आणून या मुलीवर बलात्कार केला आहे. आमदार निवासाच्या तिसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक ३०१ मध्ये तिच्यावर अत्याचार करण्यात आला. गेल्या तीन दिवसांपासून तिच्यावर अत्याचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 
पोलिसांनी या प्रकरणी रजत भद्रे आणि मनोज भगत या दोन संशयितांना अटक केली आहे. पीडित मुलगी मनोज भगत याच्या ज्वेलर्सच्या दुकानात काम करत होती. भोपाळला फिरायला जायचे आहे, असे सांगून मनोजने मुलीला आपल्यासोबत नेण्यासाठी तिच्या कुटुंबियांची परवानगी मिळवली. त्यानंतर मनोजने तिला आमदार निवासात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. 

पीडित मुलीने घरी परतल्यानंतर आपल्या कुटुंबियांना हा सर्व प्रकार सांगितला. प्रथमदर्शनी पीडित मुलगी प्रियकरासोबत आमदार निवासात गेली आणि वासनेची शिकार ठरली, असे दिसत आहे. मात्र, ही मुलगी वारंवार जबाब बदलत असल्याने अद्यापही संभ्रम आहे. त्यामुळे तिच्या वैद्यकीय तपासणीनंतरच पुढची कारवाई करता येणे शक्य आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *