👁 5 Views

स्कुटीसह रस्त्यावर पडली तरुणी ; अंगावरून पुर्ण ट्रक गेला पण ….video चा शेवट पाहून व्हाल शॉक

 

नवी दिल्ली  : रस्त्यावर चालताना किंवा गाडी चालवताना नेहमी सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. कारण इथे कधी आणि कसा अपघात घडेल, हे कोणीच सांगू शकत नाही.


स्कूटी किंवा बाईक घेऊन रस्त्याच्या एका बाजूहून दुसऱ्या बाजूला जाणं सोपं काम नाही. कारण इथे कधी काय होईल, सांगता येत नाही. अनेकदा आपली काही चूक नसताना केवळ दुसऱ्याच्या चुकीमुळेही आपल्याला अपघाताला सामोरे जावं लागतं. मात्र काही लोकांचं नशीब अतिशय चांगलं असतं.

यामुळे ते अपघातानंतरही मृत्यूच्या दारातून परत येतात. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. 
हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल की या व्यक्तीसारखं भाग्यवान कोणी नाही. व्हिडिओ हृदय पिळवटून टाकणारा आहे.




जर तुम्ही रस्त्यावर चालत असाल तर तुम्हाला खूप काळजी घेणं गरजेचं आहे. रस्त्यावर रोज अपघात होत असतात. कधी कोणतं वाहन येईल आणि कोणाला धडक देईल हे कळत नाही. या व्हायरल व्हिडिओमध्येही तेच दिसत आहे.

व्हिडिओमध्ये दिसतं की, अपघातात एक तरुणी थोडक्यात बचावली आहे. यात दिसतं की महिला घाईघाईत पडली आणि संपूर्ण ट्रक महिलेच्या अंगावरून गेला, मात्र आश्चर्याची बाब म्हणजे तिला ओरखडाही आला नाही आणि तिचा जीव वाचला.रस्त्याने जाताना आपण पाहतो की, रस्त्यावर जाम असताना दुचाकीस्वार आपली दुचाकी आणि स्कूटी वाहनांच्या मध्ये असलेल्या जागेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. असाच काहीसा प्रकार या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला.




महिला ट्रकच्या समोरून तिची स्कूटी काढत असताना अचानक गाड्या पुढे सरकू लागतात आणि ती महिला स्कूटीसह रस्त्यावर कोसळते. यानंतर ती ट्रकखाली येते आणि संपूर्ण ट्रक तिच्या अंगावरून जातो. व्हिडिओ पाहिल्यानंतर महिलेचा जीव वाचणार नाही असं एकदा वाटतं. मात्र तरी चमत्कारिकरित्या तिचा जीव वाचला. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही या महिलेला नशीबवान म्हणाल.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *