चंद्रपूर महापालिका निकाल 2017 : चंद्रपुरात कमळ फुललं..!

Loading

चंद्रपूर महापालिका निकाल 2017 : चंद्रपुरात कमळ फुललं..!
Pandharpur Live 21 Apr. 2017
चंद्रपूर: लातूरपाठोपाठ अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपुरातही भाजपने कमळ फुलवलं. भाजपने सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभवाची धूळ चारली.
भाजपने 66 जागांपैकी तब्बल 36 जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेसला अवघ्या 12 जागांवरच समाधान मानावं लागलं.
महत्त्वाचं म्हणजे चंद्रपुरात बहुजन समाज पार्टी अर्थात बसपाने तब्बल 8 जागा जिंकल्या.
चंद्रपूर महानगरपालिका निकाल 2017
भाजप – 36
काँग्रेस – 12
बसपा – 08
राष्ट्रवादी – 02
शिवसेना – 02
मनसे – 02
प्रहार – 01
अपक्ष – 03
चंद्रपूर मनपा निवडणुकीच्या 17 प्रभागातील 66 जागांसाठी 460 उमेदवार रिंगणात होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *