शिक्षण श्रेत्रात सीबीआय छाप्याने खळबळ

शिक्षण श्रेत्रात सीबीआय छाप्याने खळबळ
23 Apr. 2017

पुणे – केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) सिंहगड टेक्‍निकल इन्स्टीट्युटच्या दहा ठिकाणी छापे टाकल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रातील बडे इन्स्टिट्युटचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, नऱ्हे कॅम्पसमध्ये दंतवैद्यकिय महाविद्याल व रुग्णालयाच्या बांधकामाच्या नावाखाली घेतलेल्या कोट्यावधी रूपयांचा निधी दुसरीकडे वळवणे सिंहगड इन्स्टिट्युटचे संचालक मारूती नवले यांना चांगलेच भोवनार असल्याचे दिसते.

सिंहगड इन्स्टिट्युट हा शहरातील मोठी इन्स्टिट्युट मानली जाते. मात्र, मागील काही महिन्यांपासून या इन्स्टिट्युटमधील अनेक घोटाळे समोर आल्यामुळे शहरात खळबळ उडाली. एकापाठोपाठ घडत असलेल्या घटनांमुळे सिंहगड इन्स्टिट्युट चर्चेत आले असून दिवसेंन दिवसेन या घोटाळ्यांचा गुंता वाढतच आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि. 21) सीबीआयने सिंहगड इन्स्टीट्यूटच्या सिंहगड रस्ता, हडपसर, पुणे- मुंबई रस्ता येथील शैक्षणिक संकूलावर छापे मारले. सिंहगड इन्स्टीट्यूटचे संचालक मारुती नवले यांनी सेंट्रल बॅंक ऑफ इंडीयाकडून 2011-12 मध्ये 75.1 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. मात्र ज्या उद्देशाने हे कर्ज घेण्यात आला त्यासाठी हे पैसे न वापरता अन्यत्र वळवल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला असून, याप्रकरणाचा सखोल तपास सीबीआय करत आहेत.

शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत सीबीआयकडून इन्स्टिट्युटचे कार्यालय आणि संचालक मारूती नवले यांच्या निवास्थानाची झडती सुरू होती. त्यामध्ये सीबीआयने महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. तसेच त्यांना मदत करणारे बॅंक अधिकारी यांच्याही निवासस्थानी सीबीआयने छापे टाकले आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील दिग्गजांचे धाबे दणाणले आहेत. कारण, अनेक बडी हस्ती ओळखीच्या आणि पैसाच्या जोरावर बॅंक अधिकाऱ्यांना हाताशी धरतात आणि त्यांच्याकडून कोट्यावधी रूपयांचे कर्ज मंजुर घेतात. मात्र, ज्या उद्देशाने हे कर्ज घेतले जाते त्यासाठी कधीच या पैसांचा वापर होत नाही. नेहमी त्याचा काळाबाजारच होतो. त्यामुळे असा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, या कारवाईमुळे अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. आपली कागदपत्रे सुरक्षित करण्यामध्ये काही दिग्गज तयारीला लागले आहेत. दरम्यान, सिंहगड इन्स्टीट्यूटने सेंट्रल बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम दंतशास्त्र महाविद्यालयाच्या बांधकामासाठी न वापरता ती अन्यत्र वळविली आणि यासाठी खोटी कागदपत्रे जोडून बॅंकेची फसवणूक केली असे सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार पुढील तपास सुरू आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *