सरकारने अधिभार वाढवल्याने पेट्रोल 3 रुपयांनी महागले

सरकारने अधिभार वाढवल्याने पेट्रोल 3 रुपयांनी महागले

मुंबई- राज्य सरकारने पेट्रोलवरील अधिभारात वाढ केल्याने पेट्रोलच्या किंमती वाढल्या आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या दरात तीन रुपयांनी दरवाढ करण्यात आली.

राज्य सरकार आतापर्यंत पेट्रोलवर सहा रुपये अधिभार वसूल करीत होते. पण आता हा अधिभार नऊ रुपये करण्यात आला आहे. यामुळे राज्यभरात पेट्रोलच्या दरात तीन रुपये वाढ होत आहे. या संबंधीची अधिसूचना राज्य सरकारने शुक्रवारी सायंकाळी जारी केली. या जोडीला ज्य्‌ा सरकार शहरी भागातील ग्राहकांकडून 26 टक्के व्हॅटदेखील वसूल करत आहे. त्यात कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *