चंद्रकांत शिंदे यांच्या भिमगीतांनी पंढरपुरकरांची मने जिंकली..!

चंद्रकांत शिंदे यांच्या भिमगीतांनी पंढरपुरकरांची मने जिंकली..!

पंढरपूर लाईव्ह-
विश्वभुषण डॉ. आंबेडकर आंबेडकर यांच्या 126 च्या जयंती निमित्त मध्यवर्ती जयंती उत्सव समिती पंढरपुर  यांच्या वतीने  दिनांक 18/4/2017 रोजी सायं 7 वाजता  छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांचा  भिम गीतांचा कार्यक्रम  संपन्न  झाला. शिंदे यांच्या बहारादार भिम गीतांनी पंढरपुरकरांची मने जिंकली.  या कार्यक्रमाचे उदघाटन पंढरपुर शहर पोलिस स्टेशन चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे  यांनी केले. यावेळी दलित संघटनांचे पदाधिकारी व नेते उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन विश्वभुषण डॉ  आंबेडकर आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती 2017 पंढरपुर चे अध्यक्ष जितेंद्र बनसोडे , राजु दंदाडे उमेश सर्वगोड, कृष्णा वाघमारे, संघराज इंगळे, राजु ढवळे,  बालाजी प्रक्षाळे शरद कारटकर शैलेश आगावने यांनी  केले होते.

यावेळी सुप्रसिध्द गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांनी बहारदार भिमगीते सादर करुन उपस्थितांची मने जिंकली,  किती शोभला असता भिम नोटांवर, भिमाच्या लेखणीची धार, बुध्द वंदन, लाल दिव्याच्या गाडिला  अशा अनेक  भिमगीतांनी कार्यक्रमाला रंगत आली व आलेल्या प्रत्येक गीताला प्रेक्षकांनी दाद दिली.,

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *