काश्मिरात पीडीपीचे नेते अब्दुल गनी दर यांची हत्या
24 Apr. 2017
24 Apr. 2017
श्रीनगर – काश्मिरातील पीडीपी पक्षाचे ज्येष्ठ नेते व पुलवामा जिल्ह्याचे पक्षाध्यक्ष अब्दुल गनी दर यांची हत्या करण्यात आली आहे. ते आपल्या गावाहून श्रीनगरकडे जाण्यासाठी निघाले असताना पाहु ते िंपंगलान या दोन गावांच्या दरम्यान त्यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना श्रीनगरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पण थोड्याच वेळात त्यांचे तेथे निधन झाले. तथापि रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते, असे रुग्णालयाच्या अधीक्षकांनी नंतर सांगितले.
ते आधी कॉंग्रेस पक्षात सक्रिय होते पण 1 नोव्हेंबर 2014 पासून त्यांनी पीडीपी पक्षात प्रवेश केला होता. जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती या काश्मिरातील स्थितीबाबत केंद्रीय नेत्यांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेल्या असतानाच हा प्रकार घडला आहे. त्यांच्या हत्येची अद्याप कोणत्याही संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही. तथापि हा दहशतवादीच हल्ला होता असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकारामुळे काश्मिरातील तणावात आणखीनच भर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.