पंढरपूर तालुक्याच्या खर्डी येथील दोन तरूणांचा अपघातात करूण अंत…

पंढरपूर तालुक्याच्या खर्डी येथील दोन तरूणांचा अपघातात करूण अंत…

पंढरपूर Live 24 April

पंढरपूर तालुक्याच्या खर्डी येथील दोन तरुण आज अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर पंढरपूर येथील जनकल्याण हाँस्पिटलमध्ये उपचार चालु असताना दोघांचाही करुण अंत झाला.

याबाबत जनकल्याण हाँस्पिटलचे डॉ.आर.जी.खटावकर यांनी शहर पोलीस ठाणेत खबर दिली आहे. पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार खर्डी येथील राहुल दगडु चंदनशिवे (वय ३२) व आण्णा सत्यवान चंदनशिवे (वय २२) हे दोघे आज पंढरपूर हुन खर्डी कडे मोटारसायकलवरून जात असताना दु. १ वाजणेच्या सुमारास समोरून आलेल्या एका बोलेरो जीप गाडीने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात दोघेही जखमी झाले. त्यांचेवर पंढरीतील जनकल्याण हाँस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना उपचारादरम्यान ते दोघेही मयत झाले. 

या घटनेची नोंद शहर पोलीस ठाणेत झाली असुन अधिक तपास पोहेकाँ ननवरे हे करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *