कामावरून कमी केल्याने वैराग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचा-याची आत्महत्या..
सोलापूर- वैराग कृषी उत्पन्न बाजार समिती मधून कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्याने वैराग येथील कृषी उत्पन्न बाजार समिती उपशाखा वैरागच्या कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली .सदर प्रकार मंगळवार दि .25 एप्रिल रोजी उघडंकिस आला.
याबाबत माहिती अशी की ,बार्शी कृषी उत्पन्नबाजार समिती बार्शी येथे गेल्या सतरा वर्षा पासून एकनाथ (विकास )विश्वनाथ निलाखे वय 58 हे हंगामी कर्मचारी म्हणून काम करत होते .गेल्या आठ महिन्या पूर्वी त्यांना कामावरून कमी करण्यात आले होते .त्यांनी वैराग येथील कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली .वैराग पोलिसात आकस्मित मयत म्हणून नोंद करण्यात आली असून याघटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मधुकर पवार करीत आहेत .
दरम्यान मयत निलाखे यांच्या पत्नी सुनीता निलाखे यांनी वैराग पोलिसात अर्ज दिला असून निलाखे याना 21 अक्टोंबर 2016 रोजी प्रशासक गावडे व राजेंद्र मिरगणे यांनी तोंडी आदेश देऊन कामावरून काढून टाकले. त्याअगोदर दोन महिने काम केलेला पगार ही अदा केला नाही. निलाखे व त्यांच्या बरोबर कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांचे लेबर कोर्टात केस सुरु आहे , असे असताना मुख्य प्रशासक राजेंद्र मिरगणे त्यांच्या सहकार्याकडून माझ्या पतीस सतत धमकी देत होते .माझे पती 21 एप्रिल रोजी थकीत पगार मागण्यासाठी मिरगणे यांच्या कार्यालयात गेले असता त्यांना दामदाटी व शिवीगाळ करून कार्यालयातून धक्के मारून बाहेर काढले होते .त्यावेळे पासून माझे पती मिरगणे यांच्याशी वाद घालण्यापेक्षा मेलेले बरे असे म्हणत होते त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली माझ्या पतीची आत्महत्या प्रशासक व प्रशासक मंडळा मुळेच झाली आहे असे सुनीता निलाखे यांनी अर्जात नमूद केले आहे .आता मात्र प्रकारास वेगळे वळण लागले असून यासंदर्भात मुख्यप्रशासक राजेंद्र मिरगणे यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क करण्याचा प्रयन्त केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याने त्यांनी प्रतिक्रिया मिळू शकली नाही .
