पोलीस निरीक्षकाचा गल्ल्यावर डल्ला?

पोलीस निरीक्षकाचा गल्ल्यावर डल्ला?
28 Apr. 2017

– सीसीटीव्हीमध्ये प्रकार उघडकीस
पिंपरी, (प्रतिनिधी) – देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण मोरे यांनी हॉटेलवर कारवाई धमकी देऊन गल्ल्यातील पैसे काढून घेतले. तसेच, गुन्हा दाखल करताना त्यात कमी रक्कम दाखवून उर्वरित रक्कमेचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्या प्रकरणाची माहिती आणि “सीसीटीव्ही’ फुटेज पोलीस अधीक्षकांना पाठवण्यात आली आहे. त्यानुसार योग्य ती कारवाई व्हावी, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांनी केला आहे.

देहूरोड किवळे येथील मुकाई चौकातील पंजाबी स्वाद हॉटेलवर छाप टाकून कारवाई केली होती. कर्मचाऱ्याला मारहाण करुन गल्ल्यातील रक्कम काढून घेतली. तसेच, गुन्हा नोंद करताना कमी रक्कम दाखवली. हॉटेल चालकाने बारा ते तेरा हजार रुपये असल्याचे नमूद केले आहे. रमेशन यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक, पोलीस महासंचालक व राज्य शासनाचे मुख्य सचिव यांच्याकडे तक्रार केली आहे. मोरे यांनी सामान्य नागरिकांची लूट करत आहेत, तसेच वरिष्ठांची या प्रकरणी दिशाभूल करत असल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणी न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक मोरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *