👁 5 Views

सांगोला: मंगळवेढा – सांगोला रस्त्यावर अपघात , तरुण जखमी

 

सांगोला : चुकीच्या बाजूने येणाऱ्या दुचाकीस्वाराने कारला धडक दिली. या, अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी तर कारचालक जखमी झाले. तसेच दोन्ही वाहनांचे ५० हजारांचे नुकसान झाले आहे


घटना रविवारी (दि. २६) मंगळवेढा सांगोला रत्यावर वाढेगांव येथे घडली. करचालकाने पोलिसात याची माहिती दिली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिलीप सीताराम सोमण (रा. सांगली) हे सोलापूर येथील मयत मावशीचा अंत्यविधी आटोपून (दि.२५) दुपारी ४ च्या सुमारास चारचाकीने (क्र.एम. एच.१२ एन.पी. १५४७) सांगलीकडे निघाले होते.


 दरम्यान त्यांची चारचाकी मंगळवेढा सांगोला रोडवर आली असता समोरून येणाऱ्या मोटासायकलने (एम.एच.१३ डी.के.४६०७) जोराची धडक दिली. राहुल ज्ञानेश्वर कोरे (रा. लक्षमिदहीवडी ता मंगळवेढा) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. 

यावेळी झालेल्या अपघातात कार चालकास कपाळावर जखम झाली. तर दुचाकीस्वारास हात, पाय आणि डोक्याला गंभीर मार लागला. यावेळी कार चालकाने जखमी झालेल्या दुचाकीस्वारास ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे उपचारासाठी दाखल केले.


याबाबत दिलीप सोमण यांनी दुचाकीस्वार राहुल कोरे हा चुकीच्या बाजूने करला धडक देऊन जखमी झाला असून यामध्ये दोन्ही गाड्यांचे ५० हजाराचे नुकसान झाले असल्याची फिर्याद दिली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *