कोपर्डी खटल्यात तपासी अधिकाऱ्यांची उलटपासणीला सुरुवात

कोपर्डी खटल्यात तपासी अधिकाऱ्यांची उलटपासणीला सुरुवात
06 May.2017

नगर- कोपर्डी (ता. कर्जत) येथील गुन्ह्याची केस डायरी सरकारी पक्षाच्या वतीने शुक्रवारी न्यायालयात सादर करण्यात आली. तपासी अधिकाऱ्याची शनिवारी उलटतपासणी होणार आहे. जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू आहे. आरोपी संतोष भवाळचे वकील अॅड. बाळासाहेब खोप़डे यांनी या गुन्ह्यातील केस डायरी मागितली होती. तपासी अधिकारी शिवाजी गवारे यांची अपूर्ण राहिलेली उटतपासणीला शुक्रवारी सुरुवात झाली.

कुळधरण येथून दोन पोलिस कोपर्डी येथील घटनास्थळी पाठवले होते. त्यांची नोंद केस डायरी स्टेशनला डायरीला केली होती, असा प्रश्न आरोपीच्या वकिलांनी केला. पोलिस पाठवल्याच्या नोंदी डायरीत नव्हत्या. प्रत्येक गोष्टीची नोंदणी करणे आवश्यक नसल्याचे गवारे यांनी सांगितले. आरोपीच्या जळालेल्या मोटारसायकलबाबत गुन्हा दाखल केलेला नाही.
घटनास्थळावरून मुलीला मृतदेह कुळधरण येथील रुग्णालयात कोणी आणला, त्यांच्याकडे याबाबत तपास केला का, या प्रश्नावर तपासी अधिकाऱ्याला न्यायालयात माहिती देता आली नाही. घटनास्थळाची पाहणी करायची असून, त्यासाठी पोलिस संरक्षण द्यावे, असा अर्जही खोपडे यांनी न्यायालयात दिला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *