लाल किल्ल्याजवळ सापडले ग्रेनेड..

लाल किल्ल्याजवळ सापडले ग्रेनेड..

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ ग्रेनेड सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. सुदैवाने हा ग्रेनेड निकामी होता. मात्र भारताची शान असलेल्या लाल किल्ल्याजवळ चक्क ग्रेनेड सापडल्यामुळे सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दैनंदिन तपासणीदरम्यान काल रात्री हा ग्रेनेड सापडला. ग्रेनेड सापडल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा अर्थात एनएसजी पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत, झाडाझडतीला सुरुवात केली. निकामी ग्रेनेड ताब्यात घेऊन त्याबाबत अधिक चौकशी करण्यात येत आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातही स्फोटकांचा एक बॉक्‍स सापडल्यामुळे खळबळ उडाली होती.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *