असा शिकवला भारताने पाकिस्तान ला धडा..

8 May. 2017

नवी दिल्ली – भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना करणाऱ्या पाकिस्तानला भारताने धडा शिकवला आहे. कसा धडा शिकवला हे दाखवणारा एक व्हिडिओच आता भारतीय लष्कराने जारी केला आहे. 1 मे रोजी कृष्णा घाटीमध्ये भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या लष्करी चौक्‍या उद्धवस्त केल्या होत्या. या हल्ल्यासाठी अँटी टॅंक गायडेड मिसाईलचा वापर करण्यात आला होता. या प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या 7 सैनिकांना कंठस्नान घातले होतं.
मात्र, अशी कोणतीही कारवाई झाली नाही, असा कांगावा पाकिस्तान करत होतं. आज अखेर भारतानं या कारवाईचा व्हिडिओच जारी केल्यानं पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *