पंढरपुरात पुरंदरे पोलीसांकडून अपमानास्पद वागणूक..

पंढरपुरात पुरंदरे पोलीसांकडून अपमानास्पद वागणूक..

पंढरपूर : विठ्ठल – रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मंदिराच्या सुरक्षितेसाठी असणा-या पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिली आहे..
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे विठ्ठलाच्या दर्शनासाठी त्यांच्या गाडीने पश्चिमद्वार येथे आले. येथून मंदिरात प्रवेश करत होते. त्यावेळी त्याठिकाणच्या पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. व व्ही.आय.पी गेटने दर्शनासाठी जाण्यास सांगितले. बाबासाहेब पुरंदरे हे पश्चिमद्वार शेजारील लाडु सेंटरच्या शेजारी उन्हात बाकावर बसून होते.

त्यांना पोलिसांनी तेथून मंदिरात प्रवेश न दिल्याने पुरंदरे तेथूनच माघारी गेले.
मंदिर समिती व पोलिसांकडून पुरंदरे यांना चुकीची वागणूक मिळाल्याने पश्चिमद्वार येथे विविध संघटनानी रस्त्यावर निषेध व्यक्त केला. 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *