पंढरीत मल्टीप्लेक्स चित्रपटगृहात चित्रपट बघायला गेलेल्या सिनेरसिकाच्या मोटारसायकलची चोरी!
पंढरपूर : येथील अनिल जोतीराव वाघमारे (वय ४८, रा. बाबासाहेब आंबेडकर नगर, संतपेठ पंढरपूर) यांची मोटार सायकल अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ते पंढरीतल्या मल्टीप्लेक्स चित्रपटगृहात चित्रपट बघायला गेले होते. मल्टीप्लेक्सच्या आवारात त्यांनी पार्क केलेली गाडी चोरीस गेल्याने येथे गाड्याचे सुरक्षीततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल वाघमारे १ मे रोजी डी.व्ही.पी. मल्टीप्लेक्स चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी त्यांची क्रं. एम.एच. १३ बी.टी. ५९४० या क्रमांकाची मोटार सायकल चित्रपट गृहा बाहेर लावली होती. या मोटर सायकल चे हॅन्डलचे लॉक तोडून दुपारी एक ते चार यावेळत कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी केली आहे. पुढील तपास पो.ना. शेख करित आहेत.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111



