👁 5 Views

कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये “ इफेक्टिव टिचिंग टेक्निक्स”विषयावर कार्यशाळा संपन्न

 श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांसाठी “इफेक्टिव टिचिंग टेक्निक्स” या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. संस्थेचे चेअरमन रोहन परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली दि २४ व २५ फेब्रुवारी २०२३ रोजी या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 


पुण्यातील अॅसपायरिंग करियर या संस्थेच्या डॉ. प्रिया जगताप यांनी या कार्यशाळेमद्धे प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  एस पी पाटील यांनी या कार्यशाळेचे महत्व व उद्देश विषद केला. 


शिक्षकांजवळ असलेले ज्ञान व अनुभव यांची बदलत्या तंत्रज्ञानाशी योग्य सांगड घालून ते परिणामकारकरित्या विद्यार्थ्यांसामोर कसे सादर करावे, विविध बौद्धिक क्षमतेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बौद्धिक पातळीवर जाऊन कसे शिकवावे, विद्यार्थ्यांचा अभ्यास व परीक्षा याकडील सकारात्मक दृष्टीकोन कसा वाढवावा, विद्यार्थ्यासोबत चे संभाषण कौशल्य कसे असावे अश्या अनेक महत्वपूर्ण बाबतीमध्ये डॉ. प्रिया जगताप यांनी मार्गदर्शन केले. 

याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  एस पी पाटील म्हणाले की शिक्षक हे केवळ एक विद्यार्थी घडवित नसून ते भारताचे सुजाण, सृजनशील व जबाबदार नागरिक घडवीत असतात त्या दृष्टीकोनातून शिक्षकांनी आपली जाबाबदारी पार पाडली तर भारताचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे असे सांगून त्यांनी कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या.  


सदर च्या कार्यशाळे ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, विभागप्रमुख, प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा. राहुल पंचाळ, प्रा. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने तसेच सर्व प्राध्यापक उपस्थित होते. महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर यांनी प्रशिक्षक डॉ. प्रिया जगताप यांचे आभार मानून कार्यशाळेची सांगता केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *