👁 12 Views

शेतकऱ्यांविरोधात वक्तव्य करणाऱ्या दानवेंना महादेव जाणकर यांचा पाठिंबा

मुंबई : राज्याचे दुग्धविकास मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मात्र शेतकऱ्यांप्रती वादग्रस्त व्यक्तव्य करणाऱ्या भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवेंची पाठराखण केली आहे. दानवेंनी शेतकऱ्यांना नव्हे कार्यकर्त्यांविषयी बोलताना शिवराळ भाषा वापरल्याचे जानकरांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अशी अर्वाच्य भाषा वापरणाऱ्या नेत्याची पदावरून हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केलीय.
दरम्यान, राज्यातील शेतकरी अक्षरश: अडचणीत आलाय. शेतीमालाला दर नाही, सरकार मदत करायला तयार नाही. त्यामुळे राज्यात गेल्या दोन वर्षात 9500 हून अधिक शेतक-यांनी आत्महत्या केल्यात. अशा परिस्थितीत शेतक-यांची चेष्टा करू नका, अशी टीका माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दानवेंवर केली.
तूर, ऊस, बाजरी खरेदी आणि कर्जमाफी हे विषय आता बंद करा अशा शब्दात रावसाहेब दानवेंनी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुनावलंय. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी आपल्या तोंडाचा पट्टा चालवला. एवढंच नव्हे तर तूर खरेदीला पुन्हा परवानगी दिल्यानंतरही रडारड सुरूच असल्याचं सांगत अर्वाच्य शब्दात शेतक-यांची अवहेलना केली.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *