👁 4 Views

राज्‍यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस; नागरिकांना उकाड्यापासून दिलासा, शेतकरी मात्र चिंतेत

मुंबई- राज्‍यात मुंबई, नवी मुंबई, धुळे ,ठाणे, कल्‍याण, रायगड, पुणे, सातारा आणि सिंधुदुर्गमध्‍ये अवकाळी मान्‍सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. त्‍यामुळे वाहनचालकांसह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

सह्याद्री पट्यात विजेच्‍या गडगडाटासह पाऊस
सिंधुदुर्गात वैभववाडी शहरासह सह्याद्री पट्यात शुक्रवारी सायंकाळी विजेच्या गडगटासह जोरदार पाऊस पडला. यामुळे येथील आंबापिकाला मोठे नुकसान पोहोचण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे. वैभववाडीतील आचिर्णे मोईनवाडी येथे वादळी वाऱ्यांमुळे संजय रावराणे आणि दत्‍ताराम कोलते यांच्‍या घरांचे पत्रे उडाल्‍यामुळे त्‍यांचे नुकसान झाले आहे. तसेच रस्‍त्‍यावर मोठमोठी वृक्षे उन्‍मळून पडल्‍याने शहरात काही ठिकाणी वाहतूक ठप्‍प झाली होती.

धुळ्यात वीजपुरवठा खंडीत
धुळ्यात संध्‍याकाळी सहाच्‍या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. वादळामुळे सर्वत्र धुळीचे लोट दिसत होते. यामुळे वाहनचालकांना तसेच पायी चालणाऱ्यांनाही याचा त्रास होत होता. वादळामुळे अनेक ठिकाणचे होर्डींग्ज उडून इतरत्र पडत होते. यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडीत झाला होता. तसेच शहरात इतर ठिकाणीही नूकसान झाल्‍याचे वृत्‍त आहे.

मुंबईत वाहनचालकांची तारांबळ
मुंबई आणि नवी मुंबईमध्‍येही शुक्रवारी संध्‍याकाळी पाऊस बरसला. यामुळे वाहनचालकांसह संध्‍याकाळी खरेदीसाठी निघालेल्‍या ग्राहकांची तसेच इतर प्रवाशांचीही चांगलीच तारांबळ उडाली. एकदंरच राज्‍यात अनेक ठिकाणी मान्‍सूनपूर्व अवकाळी पावसाने हजेरी लावल्‍याने उकाड्याने हैराण झालेल्‍या नागरिकांना दिलासा मिळत आहे. मात्र यामुळे पिकांचे नूकसान होत असल्‍याने शेतकरी राजा चिंतेत आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *