👁 6 Views

चोरटयांनी फोडली पोलिसांचीच घरे, लाखोंचा ऐवज लंपास

 

याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार अल्लाउद्दीन मुसा सय्यद (वय 27) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रविवारी रात्री ही घटना घडली असून, शनिवारी सायंकाळी पावणे सहा ते रविवारी सकाळी साडे आठ यावेळेत ही घटना घडली आहेत. दोन फ्लॅट फोडून चोरट्यांनी सव्वा लाखांचा ऐवज चोरून नेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सय्यद हे पुणे पोलीस दलात पोलीस अंमलदार असून, ते क्यूआरटीत त्यांची नेमणूक आहे. दरम्यान ते विश्रांतवाडी पोलीस वसाहतीत राहण्यास आहेत. 


ते शनिवारी सायंकाळी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. तसेच, त्यांच्या घरातून 33 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. 


तर, या वसाहतीतील पवन पवार यांचेही बंद घरफोडून चोरट्यांनी 93 हजारांचा ऐवज चोरून नेला. रविवारी सकाळी साडे आठच्या सुमारास हा प्रकार समोर आल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *