👁 10 Views

सख्ख्या मेव्हाण्यांकडूनच इभूते महाराजांचा खून

अवघ्या 48 तासांत गुन्हाच्या छडा : कर्नाटकांतून दोघांन अटक
शिक्रापूर दि. 14 (वार्ताहर) –
बहिणीसोबत लग्न केले आणि आधीच्या भांडणाचा राग धरूनच कीर्तनकार हभप बालाजी महाराज इभूते यांचा खून त्यांच्या दोन सख्या मेव्हाण्यांनी केल्याचे निष्पन्न झाले असून मोबाईलवरील आलेले कॉल्स आणि लोकेशनद्वारे पोलिसांनी अवघ्या 48 तासांत चक्र फिरवून दोन्ही मेव्हण्यांना कर्नाटकात जाऊन बेड्या ठोकोल्या आहेत.
गुंडू गोपाळराव कळसे (वय 24) व प्रकाश गोपाळराव कळसे (वय 27 रा. औराद ता. औराद जि. बिदर, कर्नाटक राज्य) असे बेड्या ठोकलेल्या आरोपींचे नावे आहेत. बालाजी इभूते यांचा खून गुरुवारी (दि. 11) झाला होता. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बालाजी यांच्याकडे त्यांच्या पत्नीचा मोबाईल असल्याने त्या मोबाईलवर आलेल्या फोनची माहिती घेतली असता बालाजी यांचा सख्खा मेहुणा गुंडू याचा तो नंबर असल्याचे आढळून आले तसेच खून झाला त्या दिवशी बालाजी यांचा मेव्हणा अंत्यविधीला देखील आला नाही. यानंतर पोलिसांचा संशय अधिकच बळावला गेला त्यांनतर शिक्रापूर पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरु केला यांनतर मयत बालाजी यांचा मेव्हणा गुंडू हा त्याचा भाऊ प्रकाश याचे संपर्कात असल्याचे देखील दिसून आले यानंतर पोलिसांनी त्या दोघांच्या मोबाईल लोकेशन वरून त्यांचा मग काढला असता ते कर्नाटक राज्यात गेले असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस नाईक पोपट गायकवाड, विलास आंबेकर, विनायक नागरगोजे, अमित देशमुख, पोलीस मित्र अमोल आडणे यांनी कर्नाटकात जात तेथे मोबाईल लोकेशन व मिळालेल्या माहितीनुसार आरोपींचा शोध घेण्यास सुरवात केली. नंतर तेथे मयत कीर्तनकार बालाजी इभूते यांचा सख्खा मेव्हणा गुंडू गोपाळराव कळसे हा पोलिसांना मिळून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचा मोठा भाऊ प्रकाश गोपाळराव कळसे हा देखील शेजारी मिळून आला. त्यांनतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले या दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी खून केला असल्याचे काबुल केले.
यावेळी आरोपींना खुनाचे कारण विचारले असता मयत बालाजी यांचे आरोपींच्या बहिणीसोबत अकरा महिन्यांपूर्वी प्रेम संबंध निर्माण झाले होते. त्यानंतर मयत बालाजी याने आरोपींच्या बहिणीसोबत शिक्रापूर येथे संसार थाटला होता. तर मागील वर्षी बालाजी महाराज याने त्याचा मेव्हणा आरोपी गुंडू कळसे सोबत काही कारणाने बाचाबाची झाल्यांनतर तुझ्या मोठ्या बहिणीसोबत लग्न केलेच आहे आता काही दिवसात तुझ्या लहान बहिण सुद्धा पळवतो बघ असे सांगितले होते. यानंतर खून झाला त्याचे दोन दिवस आधीच मयत बालाजी यांची मेव्हणी ही तिच्या पतीसमवेत कामानिमित्ताने शिक्रापूर येथे राहण्यास आलेली हि माहिती मयत बालाजी महाराज यांच्या गुंडू या मेव्हण्याला कळली होती. त्यांनतर त्याने त्याचा मोठा भाऊ प्रकाश यास सांगून शिक्रापूर येथे आला त्यांनतर त्याने बालाजी यांची पत्नी मिरा हिस सांगून मला घरी न्यायला दाजींना पाठव असे सांगितले त्यानंतर शिक्रापूर चौकातून घरी जात असताना रात्रीच्या वेळेस शिक्रापूर एसटी स्थानकाजवळ आले असताना दुचाकी खाली पाडून बालाजी महाराज यांच्या डोक्‍यात दगड घालून त्यांचा खून केला. त्यानंतर त्याने मी दाजींचा खून केला असून लवकर ये असे त्याचा मोठा भाऊ प्रकाश यास सांगितले आणि प्रकाश हा गुंडूला घेण्यासाठी दुचाकी घेऊन आला व दोघे शिक्रापूर येथून फरार झाले. त्यानंतर त्यांनी दुचाकीमध्ये रस्त्यात सोडून त्यांचे मूळ गाव औराद (जि. बिदर राज्य कर्नाटक) येथे फरार झाले असल्याचे सांगितले. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी या दोघा सख्ख्या भावांना अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले हे करत आहे.


48 तासांत तपास लागल्याचा जास्त आनंद

शिक्रापूर ता. शिरूर येथे कीर्तनकार बालाजी इभूते याचा खून झाला असताना जास्त काही पुरावे समोर नसताना व आरोपी बाहेर राज्यात पळून गेलेले असताना देखील त्याचा तपास लावण्यासाठी दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे व पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मदतीने आम्हाला कर्नाटक येथे जाऊन आरोपींना अटक करण्यात यश आले असून हा तपास 48 तासात लागला असल्याचा जास्त आंनद असल्याचे यावेळी तापसी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी सांगितले.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *