👁 8 Views

विठ्ठलाच्या साक्षीने “लक्ष्मी’ची मागणी!

ठेकेदार फेडरेशनची बैठक : टक्‍केवारीसाठी दुतामार्फत प्रस्ताव

पिंपरी – खराळवाडीतील श्री विठ्ठल मंदिरात आरोग्य विभागाच्या बेरोजगार व स्वयंरोजगार संस्था ठेकेदारांच्या फेडरेशनची मंगळवारी (दि. 9) खासगीत एक बैठक पार पडली. सत्ताधारी पक्षातील एका पदाधिकाऱ्याने त्यांच्या दुतामार्फत ही बैठक बोलविण्यात आल्याची चर्चा आहे. या बैठकीत आरोग्य विभागातील ठेकेदारांना दिलेली मुदतवाढ आणि नवीन “टेंडर’ची कामे देण्यावर दुताच्या माध्यमातून चर्चा करण्यात आली. शहरात रस्ते व गटार साफसफाई करणाऱ्या 67 संस्थांच्या ठेकेदारांसमोर दुताकडून एक प्रस्ताव मांडण्यात आला. ठेकेदारांना दिलेल्या मुदतवाढीचे “कमिशन’ आणि नवीन “टेंडर’बाबतची टक्केवारी देण्यासाठी दुताने बुधवार (दि. 17) पर्यंत “अल्टीमेटम’ दिला आहे. विठ्ठलाच्या साक्षीने “लक्ष्मी’च्या दर्शनासाठी अटकळ घालण्यात आल्याने आरोग्य विभागाच्या ठेकेदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांना श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मूर्ती घोटाळ्यावरुन बेजार करणाऱ्या विरोधकांनी आता आरोग्य ठेकेदारांना विठ्ठलाच्या साक्षीने “लक्ष्मी’चे दर्शन करावे, याकरिता दबाव वाढविल्याचे बोलले जात आहे. महापालिका निवडणूकीत पारदर्शक व भ्रष्टाचार मुक्त कारभाराची हमी पिंपरी-चिंचवडकरांना देवून विद्यमान भाजप पक्ष सत्तेत आला. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने आरोग्य विभागातील ठेकेदारांना त्यांच्या दुताकडून वेठीस धरल्याची चर्चा 67 संस्थाच्या ठेकेदारामध्ये दबक्‍या आवाजात सुरु आहे. महापालिकेच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 67 बेरोजगार व स्वयंरोजगार संस्थाकडे रस्ते व गटार साफसफाईची कामे आहेत. प्रत्येक ठेकेदारांकडे 13 ते 15 असे सुमारे 925 कंत्राटी कामगार काम करतात.
आरोग्य विभागातील ठेकेदारांना दिलेल्या मुदतवाढीसाठी प्रत्येकी एका ठेकेदाराने 15 हजार रुपये द्यावे, नवीन निविदा प्रक्रियेत साफसफाईचे काम घेण्यासाठी प्रत्येकाने 2 टक्के दराने टक्केवारी द्यावी, असा प्रस्ताव संबंधित दुताने 67 संस्थाच्या ठेकेदारासमोर ठेवला आहे. या ठेकेदारांनी मुदतवाढीचे पैसे आणि नवीन कामांची टक्केवारी देण्यासाठी सर्वांसमोर 17 मे चा “अल्टीमेटम’ दिलेला आहे. याकरिता सहा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सहा दूताद्वारे ही आर्थिक रक्कम गोळा केली जाणार आहे. दरम्यान, ठेकेदारांच्या फेडरेशनने बोलविलेल्या बैठकीत हे विषय कसे व कोणी घूसडले. की, केवळ सत्ताधाऱ्यांच्या “कमिशन’ व टक्केवारीचे मुद्दे मांडायचे, याकरिता ठेकेदार फेडरेशनची बैठक घेतली का? याबाबत आरोग्य विभागाच्या ठेकेदारांमध्ये चर्चा सुरु आहे. आरोग्य ठेकेदारांसमोर ठेवण्यात आलेल्या नव्या प्रस्तावामुळे अनेकांनी सत्ताधारी भाजपच्या कारभारावर दबक्‍यात आवाजात तीव्र नाराजी व्यक्‍त केली आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *