एक्यूयोगा भाग 1
एक्यूयोगा मध्ये प्रथम वार्मअप करणे जरुरीचे आहे. वार्मअप झाल्यावर खालीलप्रमाणे कृती करावी.
1) प्रथम दोन्ही तळहाथ एकमेकांवर गरम करावेत.
2) दोन्ही हाताने तर्जनी (अंगठ्या शेजारचे बोट) कानावर पाळीच्या मागे सरळ धरावी व मध्यमा, अनामिका, करंगळी, कानाच्या पाळीच्या वर धरावी म्हणजे तर्जनी आणि इतर बोटांमध्ये पूर्ण कान हलकेच धरावा.
3) दोन्ही हाताने बोटे खालीवर जोरात फिरवून कान गरम करावेत.
4) दोन्ही कान चिमटीत पकडून खाली ओढावे. दोन्ही हाताने तर्जनी कानाच्या छिद्रातून घालून खाली दाबावी किंवा खाली ओढवी. त्यामुळे ह्रदय रोगावर चांगला परिणाम होतो. दोन्ही तर्जनी कोणासमोर धरून तोंड उघडावे. तर्जनी ठेवलेल्या जागेवर खळगा पडतो त्यात तोंड उघडलेल्या स्थितीत सावकाश मसाज करावा.
वरील क्रियेमुळे सर्व शरीर उत्तेजित होते. करण कर्ण एक्यूपंक्चरमध्ये शरीरातील सर्व अवयवावर उपचार होतो. यामुळे तात्काळ उत्साह येतो. चक्कर, भोवळ येत असेल तर कमी होते. हा प्रयोग केव्हाही कोठेही करता येतो.
डॉ. साखरे एम.एस.
M.D (Acuppuncture)
D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R
श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर
58, पार्क स्टेडियम, सोलापूर.
क्रमशः…
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





