संत नरहरी सेना महाराज
पंढरपूर प्रतिनिधी- 15 मे
सोनार समाजाचे दैवत श्री संत नरहरी महाराज यांची प्रतिकात्मक मूर्ती नव्याने बांधलेल्या गोपुरावरती बसविण्याची मागणी “राष्ट्रीय नरहरी सेना” या सामाजिक संघटेचे वतीने संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बुरांडे यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
तसेच चंद्रभागा नदीपलीकडे वारकऱ्यांसाठी विकसीत केलेल्या 65 एकर क्षेत्राला “श्री. संत नरहरी नगर” नावं देऊन श्री संत नरहरींचे भव्य स्मारक ही येथे उभारण्याची मागणी केली आहे.
आषाढी यात्रे अगोदर ह्या मागणीचा विचार केला जावा अन्यथा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आषाढी एकादशीची प्रशासनाची विठ्ठलाची महापूजा रोखली जाईल. असा इशारा देण्यात आला आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





