👁 10 Views

११२ फूट उंच ‘आदियोगी’ शिवाच्या मूर्तीची ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

तामिळनाडूतल्या कोईंबतूर इथे असलेल्या शिवाच्या ११२ फूट उंच भव्य मूर्तीची नोंद आता ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली आहे. जगातील सगळ्यात उंच आणि भव्य अर्धाकृती मूर्तीचा मान ‘आदियोगी’च्या या मूर्तीला मिळाला आहे. फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मूर्तीचे अनावरण करण्यात आले होते.
‘ईशा फाऊंडेशन’ने या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. ११२ फूट उंच, २२ मीटर रुंद, १४७ फूट लांबी असलेली शिवाची ही प्रतिमा अनेक भाविकांना आपल्याकडे आकर्षित करते. ही प्रतिमा तयार करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागला होता. त्यानंतर पुढच्या आठ महिन्यात ईशा फाऊंडेशने या मूर्तीचे उर्वरित काम पूर्ण केलं होतं. ही मूर्ती उभारण्यामागेही वेगळं कारण आहे, आदियोगी शिवाची ही प्रतिमा म्हणजे मुक्ततेचं प्रतिक आहे. शिवाची ही मूर्ती पूर्णपणे स्टीलपासून बनवण्यात आली आहे. विशेष म्हणजे धातूचे तुकडे जोडून ही प्रतिमा बनवण्यात आली आहे. आतापर्यंत एखाद्या मूर्तीचे निर्माण कार्य करताना अशा पद्धतीचा वापर केला गेला नव्हता. या मूर्तीच्या नावे विश्वविक्रमाची नोंद झाल्यानंतर आता याच उंचीच्या अनेक प्रतिमा देशभर स्थापन करण्याचा ईशा फाऊंडेशनचा मानस आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *