👁 8 Views

कळंब येथील शेतकऱ्याची विहिरीत उडी मारून आत्महत्या

मंचर, दि. 15 (प्रतिनिधी) -आंबेगाव तालुक्‍यातील कळंब येथील शेतकरी संजय निवृत्ती रामकर (वय 45) यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. मृत संजय रामकर यांचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. त्यानंतर मंचर येथील उपजिल्हा रूग्णालयात मृत संजय रामकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही.
मृत संजय रामकर यांनी बंधु अरूण रामकर यांच्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून त्यांची मानसिक स्थिती नैराश्‍यग्रस्त होती. त्यांच्या पाठीमागे दोन भाऊ, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. विहिरीत संजय रामकर यांचा मृतदेह प्रथमदर्शनी ठाकरवस्तीवरील महिलांनी पाणी भरण्यासाठी आले असताना पाहिला. त्यानंतर त्यांनी अरूण रामकर यांना घटना सांगितली. तद्‌नंतर त्यांनी ग्रामपंचायत सदस्य डॉ. सचिन भालेराव यांना झालेली घटना कळविली. पोलीस पाटील तान्हाजी कानडे यांना या घटनेची माहिती मिळताच मंचर पोलीस ठाण्याला ही घटना कळविण्यात आली.
मृत संजय रामकर यांचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला.त्यानंतर मंचर येथील उपजिल्हा रूग्णालयात मृत संजय रामकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी शोकाकूल वातावरणात मृत संजय रामकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *