पुणे : काँग्रेसला आव्हान देणारा भाजपा हा एकमेव राजकीय पक्ष ठरला आहे. मात्र, त्यामुळेच कार्यकर्त्यांवर मोठी जबाबदारी आहे. समर्पित वृत्तीने काम केले तर पक्षाची ही ओळख अधिक घट्ट होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. कार्यकर्त्यांनी सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घ्यावी, असे ते म्हणाले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दीनिमित्त सोनल हॉल येथील विस्तारक प्रशिक्षण कार्यक्रमात बापट यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, जिल्हा सरचिटणीस पांडुरंग ठाकूर, तानाजी दिवेकर, सचिन सदावरदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. बापट म्हणाले, ‘‘पंडितजींनी पक्षासाठी भरपूर योगदान दिले आहे. त्यांचा आदर्श घेऊन काम केले पाहिजे. हे काम पैशात मोजण्याचे नसून वेळेत आणि श्रमात मोजण्याचे आहे असे ते म्हणाले.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111




