👁 8 Views

आता राज्यातील शेतकऱ्यांच्या मिरचीवरही संकट

चंद्रपूर : राज्यातील शेतकऱ्यांसमोरील समस्या काही केल्या कमी होताना दिसत नाहीत कारण कांदा, तूर यांच्यानंतर आता शेतकऱ्यांच्या मिरचीवरही संकट आल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी तब्बल दीडशे रुपये किलो दराने विकली जाणारी मिरची यंदा पंधरा रुपये किलोवर पोहोचल्याने शेतकरी चिंतातूर झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. आंध्र आणि तेलंगणातही अशीच स्थिती होती. मात्र तिथल्या सरकारने हमीभाव दिल्याने त्यांच्या परिस्थिती थोड्याफार प्रमाणात सुधारणा झाली आहे.
गेल्या वर्षी 150 रुपये किलोने विकलेल्या मिरचीला आता फक्त 15 रुपये भाव आहे. चंद्रपूरच्या कोठारी, तोहोगाव, राजुरा, परसोडी, लाठी आणि चनाखा भागात मिरचीचे उत्पन्न घेतले जाते. तसेच यंदा निसर्गाने चांगली साथ दिल्यामुळे मिरचीचे बंपर उत्पन्न आलं. मात्र यंदा शेतकऱ्याला बाजाराच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागत आहे.
फडणवीस सरकारने ठरवले तर मिरची उत्पादकांना या संकटातून कसे तारता येऊ शकते, हे आंध्र, तेलंगणाने दाखवून दिले आहे. महाराष्ट्रापेक्षा गरीब असलेल्या तेलंगणा आणि आंध्रने मिरची उत्पादकांना 6 हजार 250 रुपयांचा हमी भाव दिला. केंद्र सरकार आंध्रकडून 88 हजार 300 टन तर तेलंगणाकडून 33 हजार 700 टन मिरची खरेदी करणार आहे. जर मिरची खरेदीत नुकसान झाले तर केंद्र आणि राज्य सरकार अर्धा-अर्धा भार उचलणार आहेत. तूर खरेदीसाठी सरकारने ज्या प्रमाणे पुढाकार घेतला, तसा मिरची उत्पादकांसाठी का घेतला जात नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *