👁 7 Views

‘झोमॅटो’ची वेबसाईट हॅक; १.७ कोटी ग्राहकांचे ई-मेल आयडी, पासवर्ड चोरले

जवळपास २३ देशांतील १० हजार शहरांतील ग्राहकांना सेवा देणाऱ्या झोमॅटो या फूड-टेक कंपनीची वेबसाईट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे झोमॅटोच्या १.७ कोटी ग्राहकांचे ई-मेल आयडी आणि हॅश्ड पासवर्ड चोरले आहेत.
झोमॅटो ही फूड – टेक कंपनी ग्राहकांना त्यांच्या शहरांतील हॉटेल, खाण्याची इतर ठिकाणे यांची माहिती देते. कंपनीच्या वेबसाईटवरून मागवलेले पदार्थ घरपोचही दिले जातात. ही सुविधा देताना ग्राहकाचे नाव, मोबाईल क्रमांक आणि पत्ता आदी माहिती साईटवर नोंदविली जाते. जवळपास २३ देशांमधील १० हजार शहरांमध्ये या वेबसाईटचा वापर करण्यात येतो. भारतातही मोठ्या प्रमाणात या वेबसाईटचा वापर केला जातो. ही वेबसाईट हॅक झाली असून १ कोटी ७० लाख ग्राहकांचे ई-मेल आयडी आणि हॅश्ड पासवर्ड चोरल्याची माहिती ‘हॅकरीड’ या सिक्युरीटी ब्लॉगकडून देण्यात आली आहे.

वेबसाईट हॅक झाल्याने ग्राहकांची सर्व वैयक्तिक माहिती हॅकरपर्यंत पोहोचणे सहज शक्य होऊ शकते. त्यामुळे अशाप्रकारे ग्राहकांची वैयक्तिक माहिती हॅक झाल्याच्या कारणावरुन झोमॅटो या कंपनीविरोधात भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा ४३ अ नुसार कारवाई होण्याची शक्यता आहे. या कायद्यांतर्गत वेबसाईटच्या असुरक्षिततेमुळे ग्राहकांचा डेटा हॅक होणार असल्याने कंपनीला तिच्या ग्राहकांना काही भरपाई द्यावी लागू शकते.

या वेबसाईटचा वापर महिन्याला ९ कोटी ग्राहक करतात, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. आमच्याकडे असलेला ग्राहकांचा डेटा अधिकाधिक सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न कंपनीकडून होत आहेत. काही ग्राहकांचे ई-मेल आयडी आणि इतर माहिती चोरली असली तरी त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती आणि इतर अर्थिक बाबींची माहिती सुरक्षित आहे. ती अजिबात हॅक होणार नाही. ग्राहकांची माहिती हॅक होऊ नये, यासाठी कंपनी पूर्ण प्रयत्न करते. त्यामुळे ग्राहकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *