कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये असणाऱ्या सांगवडे गावात विहीर खोदकाम सुरु असताना अंगावर क्रेन पडून तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये एक कामगार जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सांगवडे गावात विहिरीचे खोदकाम काम सुरु असताना शुक्रवारी सकाळच्या दरम्यान हा अपघात घडला. या दुर्घटनेत बाबुराव वडर (वय ५४), रामचंद्र साळवी (वय ४५), भैय्यालाल माळी (वय ३५) या कामगारांचा मृत्यू झाला. तर शिवाजी पवार हा कामगार गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अपघात नक्की कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेल नाही.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111




