👁 7 Views

सोलापूर महापालिकेत भाजपला धक्का सर्व विरोधक एकत्र आल्याने सातपैकी पाच समित्या ताब्यात

सर्व विरोधक एकत्र आल्याने सातपैकी पाच समित्या ताब्यात
सोलापूर महापालिकेच्या विविध विषय समित्यांच्या निवडणुकांमध्ये विरोधकांच्या एकजुटीमुळे सत्ताधारी भाजपची आज मोठी नाचक्की झाली. सात पैकी ५ समित्या या विरोधकांनी जिंकल्या तर दोन ठिकाणी नशिबाने साथ दिल्याने भाजपला विजय मिळाला. विरोधकांच्या या खेळीने भाजपला मोठा धक्का बसला आहे.
गेल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत सत्तांतर होऊन भाजपने सत्ता संपादन केली खरी; परंतु एकूण १०५ सदस्यांच्या सभागृहात भाजपला बहुमत मिळविता आले नव्हते. ४९ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने सत्ता खेचून आणली होती. त्या वेळी शिवसेना व काँग्रेससह विरोधक विखुरले गेल्याचा लाभ भाजपला झाला होता. मात्र त्यानंतर विविध विषय समित्यांमध्ये पालिका सभागृहातील पक्षीय संख्याबळानुसार प्रत्येकी नऊपैकी भाजपच्या वाटय़ाला चार सदस्य मिळाले तर विरोधकांकडे त्यापेक्षा जास्त म्हणजे प्रत्येकी पाच सदस्यांची संख्या होती. विषय समित्याच्या सभापती निवडणुकांची प्रक्रियेत सर्व विरोधकांनी एकत्र येऊन भाजपच्या सत्तेला सुरूंग लावण्याचे ठरविले होते. त्यानुसार भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार दिला गेला.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *