👁 10 Views

१२ वीच्या परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे – बारावी परीक्षेंचा निकाल जवळ येत चालला असून अनेक तरुण-तरुणींच्या मनात निकालाची भीती निर्माण होत आहे. याच भीतीपोटी शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथे नुकतीच बारावीची परीक्षा दिलेल्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका चंद्रकांत पोखरकर (वय १८, वर्षे रा. पिंपळसुटी, ता. शिरूर, जि. पुणे) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. प्रियांका हिने नुकतीच बारावीची परीक्षा दिली असून परीक्षा संपल्यानंतर अनेकदा ती तणावाच्या वातावरणात असलेली दिसून येत होती. यातूनच तिने आत्महत्या केल्याची शक्यता आहे.

प्रियंका ही शिरूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये १२ वी वाणिज्य या वर्गात शिकत होती. मार्च महिन्यात तिने १२ वीची परीक्षा दिली होती. गुरुवार (दि.१८) रोजी जेवण करून नेहमीप्रमाणे सर्व कुटुंबिय झोपले होते. शुक्रवारी (दि.१९) रोजी पहाटे सव्वा सहाच्या सुमारास जिवाजी पोखरकर हे उठल्यानंतर किचन रुममध्ये प्रियंका हिने पंखा अडकवण्याच्या हुकाला दोरी अडकवून गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान,१२ वीची परीक्षा दिल्यापासुन प्रियांका तणावाखाली होती. तिला पेपर अवघड गेल्याने नापास होण्याच्या भीतीने तिने आत्महत्या करण्याचे पाऊल उचलल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून घटनेचा अधिक तपास शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे  करीत आहेत.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *