👁 9 Views

जीएसटीमुळे मुंबईच्या सुरक्षेशी तडजोड नाही : मुनगंटीवार

मुंबई : जीएसटीच्या मंजुरीसाठी राज्य सरकारचे तीन दिवसीय अधिवेशन सुरु आहे. मात्र जीएसटीमुळे एलबीटीसोबतच जकात बंद झाल्यास मुंबईच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल अशी शंका शिवसेनेचे प्रतोद आमदार सुनिल प्रभू यांनी विधानसभेत व्यक्त केली. दरम्यान, जीएसटीमुळे मुंबईच्या सुरक्षेसोबत कधीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारकडून देण्यात आले.
जकात बंद झाल्यास गाड्यांचे चेकिंग होणार नाही. त्यामुळे सरसकट सर्व गाड्या मुंबईत येतील. परिणामी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे, अशी भीती सुनिल प्रभूंनी व्यक्त केली.
मुंबईच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार विशेष लक्ष देणार आहे, सुरक्षेबाबत नव्या उपाययोजना आखण्यात येतील, अशी हमी यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी दिली. राज्यातील अनेक करांमध्ये केंद्रीय जीएसटीनुसार सुधारणा केली जाणार आहे. मात्र यामुळे महानगरपालिका आणि नगरपालिकांचे कोणतेही नुकसान होणार नाही याची ग्वाहीसुद्धा मुनगंटीवार यांनी दिली.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *