👁 9 Views

एक्यूयोगा (Acuyoga) भाग 6

एक्यूयोगा (Acuyoga) भाग 6

एक्यूयोगा क्रमशः

१८) उजव्या हाताने मळहाताने (तळहाताची माघील बाजू, Dorsal hand ) मनगटावरून कोपऱ्याच्या मागे तिथून खांद्यावर दंडाच्या मागील त्रिबंध(Tricep muscle ) स्नायूवरून खांदयापर्यंत तीन वेळा मसाज करावा. हि क्रिया डाव्या हाताने उजव्या हातावर करावी.

वरील क्रियेमध्ये हाताच्या आतील बाजूस तीन यिन चॅनेल वरून खालील दिशेने म्हणजे खांद्यावरून तळहाताकडे जातात . ते तीन यिन चॅनेल म्हणजे हार्ट, पेरिकार्डियन आणि लग (ह्रदय , ह्रद्यावरण आणि फुफुस ) खांद्यांकडून तळहाताकडे मसाज केल्याने या तिन्ही चॅनेल कार्य सुधारते. तसेच हाताच्या बाहेरील तीन यांग चॅनेल वर म्हणजे बोटाकडून खांद्याकडे जातात. ते तीन यांग चॅनेल म्हणजे स्मॉल इंटेस्टइन, ट्रिपल वर्मर, लार्ज इंटेस्टइन (लहान आतडे. त्रिदोष किंवा लससंस्था किंवा लिम्फटिक सिस्टम आणि मोठे आतडे) हाताच्या मागील बाजूस बोटाकडून खांद्यापर्यंत मसाज केल्यावर या तिन्ही चॅनेल कार्य सुधारते.

१९) उजव्या हाताने डाव्या पायाचा घोट आणि डाव्या हाताने उजव्या पायच घोटा पकडून गोलाकार मसाज करावा. पायाचा घोट्यावर युवज सोर्स बिंदू आहेत त्यामध्ये सर्वात जास्त त्या चॅनेलची शक्ती असते. पायाच्या घोट्यावर मसाज केल्याने संधिवात, मूत्रविकार, लैंगिक आजार, ब्लड फ्रेशर, केस गाळाने, पाळीच्या तक्रारी, सूज इ. मध्ये फायदा होतो.

२०) उजव्या हाताने उजव्या पायाचा गुडघा आणि डाव्या हाताने डाव्या पायाचा गुडघा याला गोलाकार मसाज करावा. गुडघ्याला मसाज केल्याने, गुडघ्याचा संधिवात, पायात ताकद नसणे, लैंगिक आजार, त्वचा रोग, केस गळणे, आणिमीत पाळी इ. आजारावर फायदा होतो.

२१) उजव्या हाताने डाव्या पायाला आतील बाजूस खालील वर जांघे पर्यंत मसाज करावा. हीच क्रिया डाव्या हाताने उजव्या पायावर करावी.

वरील क्रियेमध्ये पायावरचे तिन्ही यिन चॅनल हे पायाकडून जांघेपर्यंत जातात. ते तिनी यिन चॅनेल म्हणजे लिव्हर, किडनी आणि स्प्लिन हे आहेत, त्यांचे कार्य सुधारते.


डॉ. साखरे एम.एस.
M.D (Acuppuncture)
D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R
श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर
58, पार्क स्टेडियम, सोलापूर.
मो.९८९०१९५०५९

क्रमशः

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *