👁 7 Views

‘या’ आजींमुळेच जिंकली मुंबई इंडियन्स?

22 मे : आयपीएलच्या 10 सीझनच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सनं अतिशय थरारक विजय मिळवत तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. पण या आजीच मुंबईच्या विजयामागचं खरं कारण आहेत. आहो, असं आम्ही म्हणत नाही आहोत, सोशल मीडियावरचं अशा चर्चा  रंगलेल्या आहेत.

मुंबई इंडियन्सनं प्रथम फलंदाजी करताना पुण्यासमोर अवघ्या 130 धावांचं आव्हान ठेवलं होतं. शेवटच्या ओव्हरपर्यंत मुंबई इंडियन्सच्या हातातून मॅच जातीये की काय, अशी धाकधूक मुंबईकरांना लागली होती. पण ऐन रंगात आलेल्या मॅचमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते या आजीबाईंनी… शेवटी या आजींचीच पार्थना मुंबई इंडियन्सच्या कामी आल्या आणि संपूर्ण मॅच फिरली.
मुंबई इंडियन्सनं अगदी शेवटच्या क्षणी पुण्याचा विजयाचा घास हिसकावून घेतला. पुण्याच्या बाजूने झुकलेला हा सामना, आजीबाईंना देवाचा धावा करताना दाखवल्यानंतर अचानक त्याच ओव्हरमध्ये मुंबईच्या बाजूनं झुकलं आणि पहाता पहाता मुंबईने हा सामना जिंकला.

रायझिंग पुणे सुपरजायंट्सवर अवघ्या एका धावेने विजय मिळवत मुंबईने तिसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावलं. मग काय सहाजिकच मॅच संपल्यानंतर सगळीकडे या आजीबाईंची चर्चा सुरू झाली आहे. आता या आजी कोण आहेत? त्या कुठे राहतात? या शोध आता माध्यमांनी घ्यायला सुरूवात केली खरी, पण या आजी काही सापडे ना…

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *