👁 10 Views

शिवसेनेचे मंत्री उद्या बेळगावात देणार ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा उद्या गुरुवारी बेळगावात जाऊन सेनेचे शिलेदार जय महाराष्ट्रची घोषणा देणार आहे.

जय महाराष्ट्र

सचिन व्हटे, पंढरपूर लाईव्ह
24 मे : बेळगावमध्ये जय महाराष्ट्र म्हणण्यास घातलेल्या बंदी विरोधात शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतलीये. उद्या गुरुवारी बेळगावात जाऊन सेनेचे शिलेदार जय महाराष्ट्रची घोषणा देणार आहे.
बेळगांव नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी जय महाराष्ट्र म्हणणाऱ्या मराठी लोकप्रतिनिधींच पद रद्द करणारा कायदा करणार असल्याच वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण सीमा भागात बेग यांच्या विरोधात वातावरण ढवळून निघालंय. या विरोधात शिवेन
शिवसेनेचे परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि आरोग्य मंत्री कर्नाटक संपर्क प्रमुख दीपक सावंत हे दोन मंत्री मोर्चात सहभागी होऊन जय महाराष्ट्र च्या घोषणा देणार आहेत. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मराठी परीपत्रकासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये शिवसेनेचे दोन मंत्री सहभागी होणार आहे.
गुरुवारी दुपारी १२ वाजता संभाजी चौकातून या मोर्चा सुरू होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. शिव सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाननंतर रावते आणि सावंत हे दोघे जण या मोर्चात सहभागी होऊन बेळगावात जय महराष्ट्र चा एल्गार करणार असल्याची देखील माहिती मिळाली आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *