कोल्हापूर – एसटी महामंडळाच्या एका सुसाट बसने चक्क 3 चारचाकी वाहनांसह 8 बाइक चिरडल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी येथील बस स्थानकावर घडला आहे. या भयंकर अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच इतर 10 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातही जखमींपैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. चालकाला हृदय विकाराचा धक्का बसल्याने हा अपघात घडला आहे.
चालक रुग्णालयात दाखल
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात चालकाला हृदय विकाराचा धक्का बसल्याने झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यानंतर स्थानिकांनी जखमींसह बस चालक रमेश सहदेव कांबळे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत.
मृतांची नावे
1 – देवास शामराव घोसारवाडे
2 – सुहास युवराज पाटील
अपघातात जखमींची नावे
1 – बस ड्रायव्हर – रमेश सहदेव कांबळे (रा.कांडगाव)
2 – राजाराम पाटील (पो.हे.काँ)
3 – राजाक्का गुलाब पाटील (वाशी)
4 – प्रतीक्षा योगेश नाळे (सांगरूळ)
5 – बाबुराव केशव वडणगे (शाहूपुरी)
6 – विक्रम विठ्ठल घोडके (पाचगाव)
7 – श्रीपती ईश्वर बवळकर (दोनवडे)
9 – पांडुरंग गुड्डू पाटील (दोनवडे)
10 – सतीश कृष्णात पाटील (गगनबावडा





