👁 12 Views

पनवेलमध्ये भाजप, भिवंडीत काँग्रेसचं वर्चस्व तर मालेगावात रस्सीखेच

मुंबई : पनवेल, भिवंडी-निजामपूर आणि मालेगाव महापालिकेसाठी आज मतमोजणी पार पाडली. नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेवर भाजपचं कमळ उमललं. इथे भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली.
तर भिवंडी-निजामपूर महापालिकेची सत्ता काँग्रेसने पुन्हा एकदा काबीज केली आहे. काँग्रेसने 47 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवलं.
मालेगाव महापालिकेत सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरु आहे. मात्र इथे, शिवसेना, भाजप आणि एमआयएम किंगमेकरच्या भूमिकेत आहे.

पनवेल महापालिकेवर भाजपचं कमळ

पनवेल : पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पनवेल महानगरपालिकेवर भाजपचं कमळ उमललं. रायगड जिल्ह्यात वर्चस्व असणाऱ्या शेकापचं मोठं आव्हान भाजपसमोर होतं. मात्र शेकाप महाआघाडीची धुळदाण करत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे.
रायगडमधील सर्व सहकारी संस्था, जिल्हा परिषद ताब्यात असलेल्या शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला मतदारांनी सपशेल नाकारत भाजपला स्पष्ट बहुमत दिल्याचं चित्र आहे. तसंच शिवसेनेने मोठा जोर लावल्यानंतरही शिवसेनेच्या पदरी निराशा पडली आहे.
पनवेल महापालिका : 78 जागा
मॅजिक फिगर :  40
पक्ष                         जागा
भाजप                       51
शेकाप                       23
काँग्रेस                      02
राष्ट्रवादी                   02

भिवंडीच्या सत्तेच्या चाव्या काँग्रेसकडे

भिवंडी महापालिकेची सत्ता काँग्रेसने पुन्हा एकदा काबीज केली आहे. 90 सदस्य संख्या असलेल्या भिवंडी महापालिकेमध्ये काँग्रेस 47 जागांसह अव्वल पक्ष ठरला आहे. विशेष म्हणजे भाजपने भिवंडी महापालिका खेचण्यासाठी विशेष जोर लावला होता. पण भाजपला अवघ्या 20 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. इथे शिवसेनेला 12 जागांवर यश मिळालं आहे. समाजवादी पक्ष 2 जागांवरच आटोपला, तर 10 अपक्षही निवडून आले.
भिवंडी महापालिका 90 जागा
मॅजिक फिगर : 46
पक्ष                  जागा
काँग्रेस                47
भाजप                19
शिवसेना              12
कोणार्क विकास आघाडी   04
समाजवादी पक्ष         02
आरपीआय             04
राष्ट्रवादी काँग्रेस         00
अपक्ष                 02

मालेगावात काँग्रेस-राष्ट्रवादीत काँटे की टक्कर

मालेगाव : मालेगाव महापालिका निवडणूक निकालांमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे सत्तेच्या सारीपाटामध्ये छोट्या पक्षांना महत्त्व प्राप्त झालं आहे.
काँग्रेसने सर्वाधिक 28 जागा मिळवल्या आहेत. तर त्यापाठोपाठ राष्ट्रवादीला 26 जागा मिळाल्या आहेत. याशिवाय शिवसेनेला 13 जागांवर यश मिळालं. दुसरीकडे असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमचे 7 उमेदवार विजयी झाले आहेत.
मात्र मालेगावात भाजपला ऐतिहासिक यश मिळालं आहे. एकही जागा नसलेल्या भाजपला नऊ जागांवर विजय मिळाला आहे. याशिवाय इतरांच्या खात्यात एक जागा गेल्या आहेत.
मालेगाव महापालिका  : 84 जागा
मॅजिक फिगर : 43
पक्ष                                                जागा
काँग्रेस                                            28
राष्ट्रवादी (20)+जनता दल (6)       26
शिवसेना                                        13
भाजप                                            09
एमआयएम                                   07
इतर                                              01
मालेगाव महापालिकेचा प्रभागनिहाय निहाय





सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *