प्रतिनिधी
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील माजी कृषी अधिकारी मधूकर गुंजाळ यांच्या एकसष्टी सोहळ्यानिमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजन समितीच्यावतीने दिली आहे.
माजी कृषी अधिकारी मधुकर गुंजाळ यांचा एकसष्टी सोहळ्यानिमीत्त रोपळे येथील कदम वस्ती येथे बुधवार दि.31 रोजी सायंकाळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये सायंकाळी 4 ते 7 या कालावधीमध्ये रोपळे ग्रामस्थांच्यावतीने मधुकर गुंजाळ यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले आहे. सहकार शिरोमणीचे संचालक दिनकर कदम, कुर्डूवाडीचे उपविभागीय कृषी अधिकारी पी.डी.पाटील, सोलापूरचे उपविभागीय कृषी अधिकारी श्रीधर जोशी, अखिल भारतीय सिताङ्ग ळ महासंघाचे अध्यक्ष नवनाथ कसपटे, सचिव राजेंद्र देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर सत्कार समितीमध्ये अध्यक्ष नागनाथ माळी, उपाध्यक्ष माजी सरपंच दत्तात्रय पवार,सचिव बाळासाहेब भोसले व रोपळे येथील प्रतिष्ठीत नागरीकांचा समावेश आहे.
त्याच प्रमाणे इतर खर्चाचा डामडौल न करता सामाजिक बांधीलकी जोपासण्यासाठी या कार्यक्रमामध्ये एका जोडप्याच्या विवाह सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे. तर रात्री 9 ते 11 या कालवधीमध्ये ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांचे किर्तन होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांसाठी उपस्थित रहावे असे अवाहन करण्यात आले आहे. तर हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुप्रभात मंडळ , मधुकर गुंजाळ स्नेह परिवारातील सदस्य विशेष परिश्रम घेत आहेत.





