👁 9 Views

वाल्याचा वाल्मीकी झाल्यावर पोलिसांच्या जाळ्यात

प्रतिनिधी
 गुन्हे शाखेच्या शहर पोलिसांनी 13 वर्षांपासून फरारी असलेल्या एका कुख्यात वाहनचोराला शुक्रवारी जेरबंद केले. मिर्झा रफिक अली बेग मिर्झा असफ अली बेग (52, रा. हनुमान चौक, चिकलठाणा) असे त्याचे नाव असून तो पूर्वी वाहनचोरांच्या टोळीत सक्रिय होता. त्याच्याविरुद्ध एकूण 17 गुन्हे नोंद आहेत. अनेक गुन्ह्यांत वाँटेड असलेला  बेग हा चिकलठाण्यातील गॅरेजवर काम करीत होता. वाल्याचा वाल्मीकी झाल्यानंतर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. 
पोलिसांच्या माहितीनुसार 13 वर्षांपासून फरारी असलेला मिर्झा रफिक  हा चिकलठाणा भागातील हनुमान चौकात उभा असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक राहुल रोडे यांना मिळाली होती. खबर्‍याकडून मिळालेली माहिती खात्रीशीर असल्याने त्यांनी तत्काळ पथक घेऊन सापळा रचला आणि  मिर्झा रफिक अली बेग याला अटक केली. दरम्यान, त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याच्याविरुद्ध बीडमध्ये चारचाकी गाड्या चोरीचे दोन गुन्हे नोंद असल्याचे समोर आले. त्यामुळे त्याला बीड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तसेच त्याच्याविरुद्ध क्रांती चौक ठाण्यात 9, सिटी चौक ठाण्यात 3 आणि अन्य असे मिळून 17 गुन्हे नोंद आहेत. मात्र, यातील काही गुन्ह्यांमध्ये त्याच्या टोळीला यापूर्वीच अटक झालेली आहे. केवळ  मिर्झा रफिक अली बेग हा फरारी होता. ही कारवाई उपनिरीक्षक राहुल रोडे, हेड कॉन्स्टेबल शिवाजी झिने, तुकाराम राठोड, पोलिस नाईक विलास वाघ, कॉन्स्टेबल रितेश जाधव, सुनेश कुसाळे यांनी केली. 


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *